दलित पँथरचा अनोखा वर्धापन दिन १५ जुलैला मंगळवारी सायंकाळी ६ वाजता आयोजन
मुंबई : Your question: Answer by J. V. Pawar दलित पँथरचा १५ जुलै रोजी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता राजर्षी शाहु महाराज सभागृह, तिसरा माळा, शिवाजी नाट्य मंदिर, दादर (प.), मुंबई येथे “प्रश्न तुमचे : उत्तर ज. वि. पवारांचे” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दलित पँथर आणि दलित चळवळीबाबत आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर ज.वि.पवार स्वतः देणार आहे. त्यामुळे अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन दलित युथ पॅथरचे अध्यक्ष निलेश मोहिते यांनी केले आहे.
तुम्हाला माहिती आहे का ? ज.वि पवार कोण ? Your question: Answer by J. V. Pawar
आंबेडकरी चळवळीचे कर्ते, अभ्यासक ज. वि. पवार यांना आंबेडकरी चळवळी संदर्भात प्रश्न विचारणे अन् त्यांनी प्रश्नांना उत्तर देणे. ज. वि. पवार कोण आहेत माहिती तर आहेच. पण, त्यापेक्षाही पुढच म्हणजे, दलित पँथरचे सह संस्थापक, आंबेडकर चळवळीचे भाष्यकार, आंबेडकर विचार आणि आंबेडकर चार पिढ्यांचे निष्ठावान साक्षीदार, दलित साहित्य फुले-आंबेडकरी साहित्याचे पुरस्कर्ते, अभ्यासक्रमातील १९८३ ते २०२५ (सध्या इ. १० वी) चे कवी, बाबासाहेबांच्या महाड येथील राष्ट्रीय स्मारकात कविता कोरण्यात आलेले कवी, रिपब्लिक पक्ष, भारिप बहुजन महासंघाचे नेते, प्रबुद्ध भारतचे कार्यकारी संपादक, सल्लागार,
त्यासोबतच माता रमाई यांची जन्मतारीख, विवाह स्थळ व विवाह तारीख शोधणारे संशोधक, साठ वर्षे कोणत्याही साहित्याची “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या शब्द सम्मुचयाने सुरुवात करण्याचा जागतिक विक्रम करणारे विक्रमवीर, साप्ताहाचे आठही दिवस स्तंभलेखन करणारे विक्रमी स्तंभलेखक, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ पाच खंडात शब्द बद्ध करणारे इतिहासकार, ४० ग्रंथ, २ कविता संग्रह, ५० पेक्षा जास्त ग्रंथांना प्रस्तावना देणारे लेखक, त्यांची इतर भाषेत झालेले अनुवाद, आंबेडकर निष्ठ विचारवंत, व्याख्याने, चार प्रकारच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,
चैत्यभूमीवर ग्रंथ मेळाव्याचे पायोनियर, बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य कोर्ट मुक्त करणारे, व त्या साहित्य समितीचे जेष्ठ सदस्य, मास मुव्हमेंट, सम्यक क्रांती, साहित्य कला प्रबोधिनीचे प्रवर्तक, डॉ. भदंन आनंद कौशल्यायन यांचे स्वीय चिटणीस, आंबेडकर भवन विध्वसंनातील गुंडांचे विरोधक, ज. वि. किरण मंडळ ज्यांच्या नावाने सुरू झाले ते नाकेबंदीकार कवी रिपब्लिकन पक्षाचे तीन ऐक्य साधणारे, ऐक्य इच्छुक, बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पहिले संघटक, अनेक विद्यापीठातील कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, अनेक अंकांचे सल्लागार, महाराष्ट्रातील सर्वच वर्तमान पत्राचे लेखक, विषय कोणताही असो ज. वि. उत्तर देणारं, आपण यावे !
कार्यक्रमाच्या आयोजनात असा बदल
दलित पँथर या चळवळीचा वर्धापन २९ मे २०२५ रोजी चैत्यभूमी दादर येथे होणार होता. परंतु संभाव्य पावसामुळे तो पुढे ढकलण्यात आला, तो दिन एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे व त्याला निमित्त आहे दलित पँथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे म्हणजे १५ जुलै २०२५ रोजी आयोजन.