मुंबई : वर्धेच्या शेकापूर बाई या घाटावरून अवैध रित्या उत्खननात एका आमदाराचा हस्तक असल्याचं पुढे येत आहे. भाजपाचा प्रदेश महामंत्री हा संपूर्ण रेती माफिया चालवतोय अशी सूत्रांची माहिती आहे. ज्यामध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने तब्बल पाच कोटींची रेती चोरूनही वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
शेकापुर बाई घाटावरून अवैध रित्या रेती उत्खनानंतर फक्त एकदाच पोलिसांकडून छापेमारी झाली. त्यात कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यापूर्वी आणि नंतर जवळपास 5 कोटींची रेती उत्खनन झाल्याच दिसून येते. स्थानिक महसूल विभागाकडून उत्खनन झालेल्या फेरीच मूल्यांकन केल्यास हा माल त्यापेक्षा अधिक येण्याची शक्यता आहे.
रेती उपसा सध्या बंद असला तरी झालेल्या रेती चोरीच मूल्यांकन करण्याची गरज आहे. वर्धेकरांना बेभाव रेती मिळत असल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. शासनाने घाट सुरू केल्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळेल अशी आशा असताना वर्धेच्या डेपोमधून अमरावती. यवतमाळसह इतर जिल्ह्यामध्ये रेतीची वाहतूक केली जात आहे. पोलीस प्रशासन छापेमारी करू शकते मग महसूल विभाग गप्प का असा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला जात आहे.