यशवंत पंचायतराज अभियानात तिवसा पंचायत समिती अमरावती विभागातुन प्रथम

Share

अमरावती : यशवंत पंचायतराज अभियान सन 2024-25 अंतर्गत अमरावती विभागाचा निकाल विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती व्दारे जाहीर झाला असुन, त्यानुसार विभागातील 56 पंचायत समित्यांपैकी पंचायत समिती, तिवसा ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असल्याने पंचायत समिती तिवसा 11 लाख रुपयाचे बक्षीसाकरीता पात्र ठरली आहे. महाराष्ट्र शासनाव्दारे दरवर्षी यशवंत पंचायतराज अभियान बक्षीस योजना राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेकरीता राबविण्यात येत असते.

स्पर्धेतील सर्वोत्तम पंचायत समितीच्या निवडीकरीता विभागस्तरीय मुल्यमापन समितीव्दारे पंचायत समिती, तिवसा च्या कामकाजाची तपासणी करण्यात आली होती. पंचायत समिती, तिवसा अंतर्गत सामान्य प्रशासन विभागाव्दारे, महिला बालकल्याण विभागाव्दारे, आरोग्य विभागाव्दारे, कृषि विभागाव्दारे, पाणी पुरवठा विभागाव्दारे, मनरेगा विभागाव्दारे, शिक्षण विभागाव्दारे, वित्त विभागाव्दारे, पशुसंवर्धन विभागाव्दारे,समाजकल्याण विभागाव्दारे,पंचायत विभागाद्वारे, परिषद विभागाद्वारे राबविण्यात आलेल्या योजनांची तपासणी विभागस्तरीय मुल्यमापन समितीने केली होती. 

पंचायत समितीने केलेल्या कामगीरीप्रमाणे विभागस्तरीय मुल्यमापन समितीने केलेल्या गुणदाणानुसार विभागातील पाचही जिल्हयातील एकुण 56 पंचायत समित्यांपैकी पंचायत समिती तिवसा ला सर्वाधिक गुण मिळाल्याने पंचायत समिती, तिवसा अमरावती विभागात प्रथम क्रमांकाकरीता पात्र ठरली. अमरावती विभागातुन पंचायत समिती, तिवसा प्रथम आली असल्याने पंचायत समिती, तिवसा ही विभागस्तरावरील 11 लाख रुपयाचे बक्षीसाकरीता पात्र ठरली आहे. तसेच त्यापुढील राज्यस्तरीय स्पर्धेकरीता पात्र ठरली असुन राज्यस्तरावरील मुल्यमापण समितीव्दारे पंचायत समिती, तिवसा ची तपासणी लवकरच होणार आहे.

पंचायत समिती, तिवसा विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाचे 11 लाख रुपयाचे बक्षीसाकरीता प्राप्त झाल्याने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अभिषेक कासोदे व सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी पंचायत समिती, तिवसा चे सभागृहात दिनांक 1 एप्रिल, 2025 रोजी आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी गट विकास अधिकारी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेकरीता यापेक्षा जास्त जोमाने काम करण्याचे आवाहन पंचायत समिती, तिवसा चे अधिकारी कर्मचारी यांना केले. 

या कामगिरीसाठी संजीता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती, प्रिती देशमुख, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, अमरावती, बाळासाहेब बायस, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जि.प. अमरावती, कल्पनाताई दिवे, माजी सभापती तसेच पंचायत समितीचे सर्व माजी पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group