राज्य शासनाचे वाळू धोरण अद्याप जाहीर झाले नाही. परिणामी वाळू तस्करांचा धुमाकूळ राज्यभरात सुरूच आहे. हिंगणघाट येथील वाळू तस्करांकडून नुकतेच 22.61 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. विना परवानगी शेकापुर बाई नदीला पोखरण्याच्या घटना उघड झाल्या आहे. मात्र, त्यानंतरही अजूनही वाळू तस्कर सक्रिय आहे.
वर्धा : वणा नदीच्या शेकापुर बाई घाटातून वाळूची चोरी सर्रास चोरी केली जात आहे. अद्याप घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होत नसून, तीच वाळू तस्कर खुल्या बाजारात चढ्या दराने विकत आहे. महसूल अधिकाऱ्यांना याची संपूर्ण माहिती असतानाही महसूल विभागाकडून याकडे मात्र कानडोळा केला जात आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे असे म्हणाले
अर्ज केल्यापासून 15 दिवसांत घरकुलधारकांना वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे. तर घरकुलांना 5 ब्रास मोफत वाळू दिली जाईल, असेही बावणकुळे म्हणाले होते.
वाळू तस्करांना महसूल विभागाचे अभय
वर्धा जिल्हात सर्वात मोठी वर्धा नदीचे पात्र आहे. ज्यामध्ये कोट्यवधींची वाळू तस्करी सर्रास सुरू आहे. त्याशिवाय वर्धा जिल्ह्यातील सर्व नद्यांवर सुद्धा वाळू तस्कर सक्रिय आहे. यापैकी अनेक ठिकाणी पोलिसांकडून कारवाई केली जात असतांना महसूल विभाग मात्र फक्त बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच वाळू तस्करी सुरू असल्याचे उघड दिसून येत आहे.