
VISHAL GAVALI : विशाल गवळीच्या तुरुंगातील आत्महत्येमुळे गृहविभागावर प्रश्नचिन्ह
मुंबई : बदलापूर येथील एका बालिकेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जनआक्रोशानंतर लगेच अक्षय शिंदेंचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर आता, कल्याणमधील चक्कीनाका भागातील बालिकेवर अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त करून सर्वसामान्यांकडून फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात असतानाच त्याने तळोजा तुरुंगातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे आता पुन्हा गृहविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे…