
म्यानमार, थायलंड हादरले! भूकंपामुळे ७०० जणांचा बळी, जखमींची संख्या १,६०० च्या पुढे
म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मंडाले शहरापासून १७.२ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेलं भारताच्या शेजारील राष्ट्र म्यानमार हे सध्या गृहयुद्धात अडकलं आहे. त्यातच म्यानमारवासियांवर शुक्रवारी आणखी एक संकट कोसळलं. म्यानमार व शेजारच्या थायलंड या दोन देशांमध्ये शुक्रवारी मोठा भूकंप झाला. या शक्तिशाली भूकंपात ७०० हून अधिक लोकांचा बळी…