
चॅटजिपीटी वापरून घिबळी स्टाईल फोटोचा समाजमाध्यमांवर ट्रेंडिंग
देशात झपाट्याने तंत्रज्ञान बदलत असतांना, नुकतेच चॅटजिपीटीचा वापर करून घिबळी स्टाईल फोटो बदलवण्याचा ट्रेंन्ड सुरू आहे. यामध्ये पंतप्रधानांसह देशभरातील नेते, सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. समाजमाध्यमांवरील प्रत्येक सोशल हँन्डलवर घिबळी स्टाईल फोटो दिसून येत आहे. अनेक जण आपल्या परिवारासोबतचे फोटो घिबळी स्टाईल करून समाजमाध्यमांवर व्हायरल करतांना दिसून येत आहे.