
…त्या कर्करोगाशी लढणाऱ्या अभियंत्याला मिळाले नवजीवन
मुंबई : नागपूरचा २६ वर्षीय अभियंता तीर्थनकार निरंजन रॉय एका अत्यंत गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याला रक्ताचा कर्करोग (हॉजकिन्स लिम्फोमा), तोही चौथ्या टप्प्यात, झाल्याचे निदान झाले होते. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत चालले होते, वजन तब्बल २० किलोने घटले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार मिळण्यास विलंब होत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही योग्य…