
एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा नांदेडमध्ये ‘महाएल्गार’ मोर्चा
नांदेड: बंजारा समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी आज लाखो बंजारा बांधवांनी नांदेड शहरात महाएल्गार मोर्चा काढला. पारंपारिक वेशभूषा आणि वाजंत्रीच्या गजरात, ‘जय सेवालाल’च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. मोर्चानंतर झालेल्या सभेत ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे महासचिव, धनराज राठोड यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला. ते म्हणाले, “जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅझेटियरनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून…