
पदोन्नतीनंतर क्रिम पोस्टींग सुटेना; नगरपरिषद संचालनालयाच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात
मुंबई : राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवण्याकरिता महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नगरपरिषद संचालनालयाने काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची केलेली पदोन्नती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकारी आणि मुख्याधिकारी ‘ब’ गटाचील अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर या अधिकाऱ्यांना त्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवण्याची मेहरबानी काही अधिकाऱ्यांवर दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे स्विय सहाय्यक असलेल्या एका अधिकाऱ्याचे त्याकरीता नाव वापरल्याची…