मुंबई : (sujat ambedkar) हिंगोलीतील गुंज (माळ), वसमत येथील ट्रॅक्टर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरीकांशी संवाद साधला, शिवाय त्यांचे दैनंदिन समस्या सुद्धा जाणून घेतल्या. तर मृतक कुटुंबातील नातेवाईकांचे त्यांनी सांत्वन केले.
4 एप्रील रोजी झाला होता अपघात(sujat ambedkar)
पीडित महिलेच्या मुलीने घडलेला प्रसंग सुजात आंबेडकर यांच्या समोर सांगितला. 4 एप्रिल रोजी मोठा अपघात झाला होता ज्यात 9 शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला होता.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, नागोराव पांचाळ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.