मुंबईः (Bhiwandi Sucide Case) मुंबईच्या भिंवडीमध्ये 3 लेकींना घेऊन बायकोने टोकाचे पाऊल उचलले आहे. छताच्या पाईपला गळफास घेऊन 3 मुलींसह त्याच्या आईने आत्महत्या केली आहे.
आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ (Bhiwandi Sucide Case)
भिवंडी शहरातील कामतघर येथील फेणेपाडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 3 मुलींच्या आईने टोकाचे पाऊल का उचलले त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पहिली मुलगी 12 वर्षांची, दुसरी 7 वर्षांची तर तिसरी मुलगी 4 वर्षांची होती. तीन मुलींसह 32 वर्षीय आईने घरातच छताला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
3 मे रोजी पहाटेच्या सुमारास प्रकरण उघडकीस
संबंधित महिलेचा पती रात्रीची ड्युटी करून सकाळी घरी आल्यावर हा धक्कादायक प्रकार उगड झाला आहे. पत्नी दरवाजा उघडत नसल्याने त्याने खिडकीतून पाहिले तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पतीने या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. भिवंडी शहर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलीसांकडून सखोल तपास सुरू
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. महिलेच्या पतीची चौकशी केली जात आहे. तसेच शेजारी, नातेवाईकांकडूनही माहिती घेतली जात आहे. संबंधित महिलेनं हे टोकाचे पाऊल का उचलले ? या दिशेने तपास सुरू आहे.