वर्धा: shekapur bai mafiya हिंगणघाट तालुक्यात वाहणाऱ्या वना नदीचे पात्र वाळू तस्करांनी पोखरून ठेवले आहे. या वाळू तस्करीकडे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील यांचे दुर्लक्ष आहे. परिणामी या नदीचे पात्र कोरडे पडले असून स्थानिक आमदार, महसूल अधिकारी यांच्या आशिर्वादाने रेती उपसा केली जात आहे.
शासनाला कोट्यावधीच्या गंडा ; तरीही शासन गप्प shekapur bai mafiya
गेल्या चार महिन्यांपासून हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर बाई, दरोडा या घाटावरून रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. अवैध मार्गाने रेतीची वाहतूक करून रेती तस्करांनी शासनाला कोट्यवधीच्या गंडा घातला आहे. सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाने स्थानिक नेत्यांनी या घाटावर आपला व्यवसाय सुरू केला आहे. असे असतानाही महसूल विभाग कोमात आहे की रेती तस्करांना पाठीशी घालत आहेत? असा रडून उपस्थित केला जातोय.
या भागातील राजकीय नेते अधिकारी ट्रैक्टर भाड्याने घेऊन तस्करांना बळ देत आहेत. पोलिसांकडूनही कारवाई होत नसल्याचं चित्र आहे. दररोज या घाटावरून 100 पेक्षा अधिक रीतीने भरलेल्या ट्रकांची वाहतूक होते.
महसूल विभाग ट्रकांवर थातुरमातुर कारवाई करते. आणि घाटांवर जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने सुरू असलेल्या रेती उत्खननावर दुर्लक्ष केले जात आहे. रात्र पाळीत रेती उत्खनन होत असून आतापर्यंत कोट्यावधीचा रेतीची तस्करी याभागातून करण्यात आली आहे.