विदर्भात रेती चोरीत भाजपचे महामंत्री अव्वल
वर्धा : (sand mafiya) एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या तालुका महामंत्र्यांचे रेती चोरीचे ट्रॅक्टर हैप्पी करण्यात आले, मात्र दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातील शेकापूर आणि डारोडा या घाटावर भाजपचे महामंत्री रेती चित्रीत असल्याची माहिती आहे. प्रशासन त्यांच्यावर का कारवाई करत हे आता स्पष्ट झालय.
गौण खनिज चोरीवर आमदारांचा आशीर्वाद sand mafiya
वर्धा जिल्ह्यात गौण खनिज चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नियमबाह्य वाळूचा उपसा सुरू असतानाही महसूल विभागाने अद्याप कुठलीच कारवाई केली नाही. या वाळू तस्करीत भाजपाचे महामंत्री जे स्थानिक हिंगणघाट मतदार संघाच्या आमदाराचे खास आहेत. त्यामुळे या घाटावर कारवाई शून्य आहे.
घाटाकडे महसूल अधिकाऱ्यांचा फिरकू नये असे अघोषित आदेश असल्याचे दिसून येताय. चंद्रपूर जिल्ह्यात रेती चोरी प्रकरणी भाजपच्या नेत्यांनी आवाज उचलला आणि कारवाई सुरू झाली. वर्धा जिल्ह्यात मात्र रेती तस्करांविरोधात कुणीच आवाज उचलत नसल्याचे दिसून येतय.
घरकुल बांधकामासाठी नागरिकांना रेती मिळत नाही. महाराष्ट्रात रेती अभावी घरकुलचे बांधकाम रखडले आहे. सर्वसामान्य जनतेला तिप्पट भाव देऊन रेती खरेदी करावी लागते आहे.