निलंबनाऐवजी अकार्यकारी करून पाटील आयुक्तालयात सक्रिय
मुंबई : Sachin Patil’s viral video परिवहन आयुक्तालयात नियुक्त मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील गेल्यावर्षी सेटिंग करून विनंती बदलीवर परिवहन आयुक्त कार्यालयात रुजू झाले होते. वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने लक्ष्मी दर्शनाची जबाबदारी असलेल्या पाटीलचा कामाचा अवाका वाढला, पाटलांनी त्यांच्या वाहनांवर ठेवलेल्या चालक सुद्धा खासगी ज्याचा राज्य परिवहन विभागाशी तिळमात्र सबंध नाही. अशापरिस्थितीत गेल्या एक वर्षांपासून चालकाच्या हातानेच सुरू असलेल्या दंडाच्या कारवाईचा पर्दाफाश एका व्हायरल व्हिडिओने केला आणि सचिन पाटील यांची मुजोरी उघड झाली.
व्हिडिओतील घटना काय ? Sachin Patil’s viral video
मुंबईतील एका परिसरात सचिन पाटील ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र, नेहमीप्रमाणे पाटील गाडीत बसून बेकायदा शासकीय गणवेशात असलेल्या गाडी चालकालाच मशीन घेऊन ट्रॅव्हल्सवर करवाईसाठी पाठवलं, मात्र याचदरम्यान ही दुर्घटना घडली असून, यासह इतर गंभीर घटना व्हिडिओ मध्ये कैद झाले आहे.
आयुक्तालय पाटलांवर मेहेरबान का ?
व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर परिवहन आयुक्तालयाने तातडीने सचिन पाटील यांना निलंबित करून निपक्ष चौकशी सुरू करायला हवी होती. शिवाय, चौकशीमध्ये बाधा येऊ नये म्हणून दुसऱ्या कार्यालय अधिकाऱ्यांना याची चौकशीसाठी नियुक्त करायला पाहिजे. मात्र असे न करता वरिष्ठांच्या आशिर्वादामुळे पाटलांचा आयुक्तालयात थाट असून, भविष्यात व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील चौकशीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकते.
भरारी पथकातील एआयएमव्ही गेले कुठे ?
भरारी पथकात आयएमव्ही, एआयएमव्ही आणि चालक असे पथक असते. मात्र पाटील चालकाला घेऊनच करवाईसाठी निघाले. त्यामुळे त्यांच्या पथकातील एआयएमव्ही कुठे होते. असाही प्रश्न उपस्थित होत आहे.