रविवारी दुपारपासून उत्खननाला सुरुवात
वर्धा: (Reti mafiya) हिंगणघाट तालुक्यात शेकापुर बाई या घाटावरून रविवारी सकाळपासून पोकलेन आणी जेसीबीच्या माध्यमातून अवैध रित्या उत्खननाला सुरुवात झाली. यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी रेतीमाफियांवर कारवाईकरून त्यांचे ट्रक पकडले होते. मात्र, त्यांनंतर आता पुन्हा एकदा रेती तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहे.
अधिक वाचा : https://mahalakshvedhi.com/wardha-collector-reti-chori/
महसूल विभागाच्या धोरण धाब्यावर (Reti mafiya)
रेती माफियांनी या घाटावरून आधीच जवळपास पाच कोटींच्या वर रेतीची तस्करी केली आहे. शासन, प्रशासनाच्या धोरणाला रेती माफियांनी हरताळ फासली आहे. विविध जिल्ह्यात रेती माफियांवर कारवाई होत असताना वर्धा जिल्ह्यात मात्र घाटावरील कारवाई शून्य आहे.
अधिक वाचा : https://mahalakshvedhi.com/retimafiya-higanghat-sdo-tahsildar-retimafiya/
रेती तस्करीत स्थानिक आमदाराच्या आशिर्वादाने भाजपचा पदाधिकाऱ्याने आपले रेती तस्करीचे जाळे विणले आहे. यातून रेती तस्कर गडगंज झाले असून कोट्यवधीची संपत्तीचा धनी आहे. त्यामुळ नागरिकाना वर्धा जिल्ह्यात चढ्या दराने रेती विकत घ्यावी लागते. रेती तस्करांवर जिल्हा प्रशासनावर अंकुश नसून स्थानिक अधिकारी दहशद मध्ये म्हणा किंवा रसद मिळाल्याने कारवाई करत नसल्याच दिसून येते.
एकीकडे आर्वीचे विधान परिषदेचे आमदार रेती तस्करांवर धडक कारवाई करण्यासाठी पुढे येतात तशीच काटवी स्थानिक आमदार समीर कुणावर का करत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.