पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील घरांची खरेदी विक्री रजिस्ट्रेशन सुरु

Share

मुंबई : पनवेल नैना प्रभावित क्षेत्रातील बांधकामांमधील घरांचे बंद असलेले खरेदी विक्री रजिस्ट्रेशन सुरु करण्यासंदर्भात मार्ग निघावा यासाठी अधिवेशन काळात एक तातडीची विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली होती. त्यानुसार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात या संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेले काही महिन्यांपासून बंद असलेले खरेदी विक्री रेजिस्ट्रेशन हा शेतकरी व नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने ते त्वरित सुरु करणे संदर्भात मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली. या विषयात ठोस धोरण कसे तयार करता येईल या विषयी सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली.

नैना क्षेत्रातील बांधकामे संरक्षित करणे व ग्रामस्थांच्या नैना विषयी सर्व अडचणी दूर करण्याची मागणी आ. विक्रांत पाटील यांनी सातत्याने केली असून या विषयात विशेष लक्षवेधी लावून शासनाचे लक्ष ही वेधून घेतले होते. त्यांच्या माध्यमातून या विषयाचा सतत पाठपुरावा सुरु असून या मागण्यांनुसार सिडको प्रशासनाने या विषयात सकारात्मकता दाखवली आहे. मग या विषयात खरेदी विक्री रेजिस्ट्रेशन सुरु करण्यासंदर्भात ही सिडको ने सकारात्मक भूमिका घ्यावी ही मागणीही आमदर विक्रांत पाटील यांनी केली आहे.

सदर विषयात तातडीने धोरण तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री सन्मा चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही सिडको व नोंदणी महानिरीक्षक यांना दिले. एकंदरीत या विशेष बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने या बरेच महिने रखडलेल्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयात मार्ग निघण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. या बैठकीला मा. कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब जी पाटील, सिडको अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, राज्याचे नोंदणी महा निरीक्षक (IGR) श्री रवींद्र बिनवाडे, सिडको व मुद्रांक शुल्क विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group