धर्माच्या आधारे देश उभा राहू शकत नाही; जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका

Share

लोकांना धर्माच्या आधारे भडकवलं जात आहे आणि त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून केला आहे.

मुंबई : आपल्या देशातील मूळ प्रश्न बाजूला ठेऊन लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवलं जात आहे. आपली तरूण पीढी याला बळी पडत आहे. धर्माच्या आधारे कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले. जगातले सर्व देश धर्माला बाजूला करून विकासाकडे जात आहेत, पण आपण धर्माच्या दिशेने परत जात आहोत असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे हे मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात संबोधन करत होते.

काय म्हणाले राज ठाकरे?

धर्माच्या आधारे देश उभा करू शकत नाही हे पहिल्यांदा टर्की या देशाला समजलं. त्या ठिकाणी केमाल पाशा आले आणि त्यांनी धर्मावर आधारित सत्ता बाजूला ठेवली. धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही हे त्यांना समजलं. टर्की धर्मनिरपेक्ष करून इस्लामला राज्याचा धर्म म्हणून काढून टाकलं. शरिया कायदा बंद केला.

हे देश धर्मातून बाहेर पडत आहेत आणि आपण धर्माकडे जातोय. ज्यावेळी लाऊड स्पीकर बंद करा म्हटल्यावर आमच्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल केल्या. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यावर कारवाई करणार. पण पाऊल मात्र उचललं नाही. त्या उत्तर प्रदेशात लाऊड स्पीकर बंद केली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group