बोधगया : (PrakashAmbedkar) बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आंबेडकर 4 दिवसांपासुन बिहार दौर्यावर (PrakashAmbedkar)
ॲड. आंबेडकर हे मागील 3-4 दिवसांपासून बिहार दौऱ्यावर असून, त्यांनी या कालावधीत बिहारमधील विविध संघटना व समूहांशी संवाद साधून महाविहार मुक्ती लढ्याला व्यापक स्वरूप दिले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातही वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलनं करून व स्वाक्षरी मोहिमा राबवून या लढ्याची तीव्रता वाढवली आहे.