Paud nageshwar mandir; पौडमधील मंदिरातील विटंबना कृत्य हे समाजविघातक

Pune
Share

अशा नराधमांवर कठोर कारवाई होणार – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा इशारा

पुणे : (Paud nageshwar mandir) “मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीसमोर घडलेली विटंबनेची घटना अत्यंत घृणास्पद आणि समाजविघातक आहे. हे कृत्य करणारा व्यक्ती माणूस नसून हैवान आहे. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि होणारच,” असा ठाम इशारा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला.

सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात (Paud nageshwar mandir)

गोखलेनगर येथे पार पडलेल्या शिवसेना छत्रपती शिवाजीनगर विधानसभा सदस्य नोंदणी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांच्या सहकार्याने केले होते. युवासेना सचिव किरण साळी, उपशहर प्रमुख संजय डोंगरे, विधानसभा प्रमुख युवराज शिंगाडे, विभाग प्रमुख संजय तुरेकर, अक्षदा धुमाळ, राजू विटकर, बाळासाहेब मालुसरे, रोहित वेणूसे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “वानरही रामकथेचा आदर करतात आणि गुरुदत्तांच्या मागे लहान प्राणीही असतात. अशा पवित्र ठिकाणी हे घडणे दुर्दैवी आहे. अफवा पसरवायच्या नाहीत, पण वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. पोलिस अधीक्षकांना बोलावले असून, मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे या प्रकाराविरोधात कडक कारवाईसाठी निवेदन देणार आहे.”

त्याचबरोबर, “समाजात काही बाहेरून आलेले लोक बेकायदेशीर व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक शांततेला बाधा पोचवत आहेत. त्यामुळे ‘एक है तो सेफ’ हा नारा विसरता कामा नये. अशा घटकांविरोधात जनतेने सजग राहिले पाहिजे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिलांच्या आरोग्यासाठी विशेष अभियानाची घोषणा

15 ऑगस्टपर्यंत 200-300 महिला व मुलींचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाईल. त्याचबरोबर मुलींना (12ते 18वर्ष वयोगटातील) या शिबिरात कॅन्सर पासून संरक्षण देणारे मोफत लसीकरणही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “रक्त आणि कॅल्शियम कमी असले तरी महिलांचा आवाज खणखणीत असतो, पण संघटना मजबूत हवी असेल तर तब्येतीही मजबूत हव्यात,” असे त्यांनी नमूद केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group