वर्धा : (Pankajbhoyar)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय वर्धेचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या गृहजिल्ह्यात रेती तस्करांनी शेकापुर रेती घाटावरून अवैध रित्या पाच कोटींच्या रेतीची तस्करी केली. रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही त्यातून कोट्यवधीच्या रेतीमधून शासनाचा महसूल बुडवला आहे. महत्वाच म्हणजे रेती तस्कर हा भाजपचा मोठा नेता असून त्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.
जनतेची आर्थिक लूट (Pankajbhoyar)
रेती तस्करांमुळे प्रशासनाला मिळणारा महसूल बुडाला असून सामान्य जनतेला चढ्या दराने रेती खरेदी करावी लागते आहे. सोबतच वर्धा जिल्ह्यातल्या डेपो असून चंद्रपूर आणि अमरावती सारख्या शहरात विना परवानगी समृद्धी महामार्गावरून रेती तस्करी केली जात आहे.
महसूल मंत्री, गृहराज्यमंत्री विदर्भातील आहे. तरीही रेती तस्करांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. रेती तस्करींमध्ये भाजपचे जाळे विणले गेल्याने कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे. शेकापूर या घाटावरून पाच कोटींच्या अधिक रेती चोरी गेली. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच चोरी होत असून राज्यात रेती तस्करांनी काय उच्छाद मांडला असेल हे येणाऱ्या काळात माहिती पडेल.
अवैध रित्या जेसीपी आणि पोकलेनच्या साह्याने रेती उपश्यामुळे नद्याची दिशा बदलत चालली असून पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. दरवर्षी या भागात नागरिकांना पुराचा धोका निर्माण होतो. नदीच पाणी गावात शिरून अनेक घरांची राखरांगोळी होते. मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे.
रेती उत्खननासाठी प्रशासनाकडून काही नियमावली टाकून दिल्या आहे. त्यात जेवढ्या क्षेत्रासाठी उत्खननची परवानगी असेल तेवढ्याच क्षेत्रात रेतीचा उपशा केला जावा. दुसर म्हणजे उत्खननामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कमी करण्यासाठी नियम आहेत, जसे की नदीपात्रातील पाणी पातळी आणि वनस्पतींचे संरक्षण करण्याची जबाबदारी काटेकोर पणे पाळली पाहिजे. त्याचबरोबर बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली पाहिजे असा नियम आहे. कठोर नियम शासनाने घालून दिले असले तरी भाजपचे नेते या नियमाना सर्रास तोडताना दिसून येत आहे.