मुंबईः (Pahalgam Terror Attack) काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या झाली. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी हा हल्ला केला आहे. त्याचा परिणाम भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील संबंधांवर झाला आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. अशातच पाकिस्तानच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू गुल फिरोजाने भारता विरोधात बरळली आहे. आगामी भारतातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खेळण्यास अजिबात रस नसल्याची प्रतिक्रीया दिली आहे.
काय म्हणाली गुल फिरोजी(Pahalgam Terror Attack)
“आम्ही भारतात खेळत नाहीय. आम्हाला भारतात खेळण्याची इच्छा नाहीय. पण इतकं आम्हाला माहित आहे की, आम्ही आशियाई कंडिशन्समध्ये खेळणार आहोत. श्रीलंका किंवा दुबई कुठेही सामने झाले, तरी तिथली स्थिती आशिया सारखी असेल अशी अपेक्षा आहे. आमचे क्वालिफायरचे सामने मायदेशात होते. त्या हिशोबानेच पीच बनवण्यात आला होता. जिथे कुठे वर्ल्ड कपचे सामने होतील, तिथली परिस्थिती देशांतर्गत मैदानासारखीच असेल. आमची तयारी तशीच असेल आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत” असं गुल फिरोजा म्हणाली.

पाकिस्तान सोबत मॅच होणार नाही
पहलगाम हल्यानंतर भारत – पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावपुर्ण संबंध आहे. अशापरिस्थितीत BCCI स्वतंत्र कोणताही निर्णय घेणार नसून भारत सरकारच्या सूचनांच पालन करतील असे बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले आहे. त्याशिवाय, सध्याच्या धोरणानुसार टीम इंडिया पाकिस्तान सोबत कुठलीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळत नाही. पुढेही हेच धोरण कायम राहिलं. पण ICC टुर्नामेंटमध्ये भारतीय टीम पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामने खेळते.