मुंबई ः (Pahalgam Terror Attack) जम्मु कश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांना आतंकवाद्यांनी निशाना केला. पोलीसांच्या वेशात आलेल्या आतंकवाद्यांना त्यांची नावे विचारून त्यांना गोळ्या घातल्या. यामध्ये तब्बल 26 पर्यंटकांचा मृत्यु झाल्याची प्राथमीक माहिती आली आहे. त्यासोबतच अनेक पर्यंटक गंभीर जखमी असल्याचे माहिती पडते आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यु झाला आहे.
आजपर्यंतचा सर्वात मोठा आतंकवादी हल्ला (Pahalgam Terror Attack)
काँग्रेसचे नेता पवन खेडा यांनी संताप व्यक्त केला आहे. जम्मु कश्मीरच्या इतिहासात कधी असा हल्ला झाला नाही. या घटनेमध्ये मृतकांबद्दल श्रद्धांजली वाहिली असून, जखमींना त्यांनी धीर दिला आहे. या घटनेनंतर सरकारने विरोधकांना विश्वासात घेण्याचे आवाहन केले आहे. या घटनेच्या विरोधात लढण्यासाठी देश सक्षम असल्याचेही खेडा म्हणाले आहे.

या घटनेनंतर अमीत शहा जम्मु कश्मीरमध्ये दाखल
पहलगाम येथील घटनेनंतर गृहमंत्री अमीत शहा तातडीने जम्मु कश्मीरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सर्व एजन्सींसोबत श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलवली होती.

अमीत शहांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
शिवसेना उबाठाचे नेते सजंय राऊत यांनी या घटनेनंतर देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांच्यावर संतप्त टिका करत राजीनामा मागीतला आहे. लोकांची सुरक्षा राम भरोसे आहे. त्यामुळे राम सुद्धा वैतागले असतील. त्यामुळे आतातरी अमीत शहा यांनी राजीनामा द्यावा असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी मागणी केली आहे.