शेकापुर बाई नदीतील 5 कोटींच्या वाळूवर माफियांचा डल्ला

वर्धा जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू आहे. वाळू घाटांचा लिलाव झाला नसूनही कोट्यवधीची वाळू तस्करी शेकापुर बाई या नदीवरून सर्रास होत आहे. दिवसाला 100 ट्रक वाळूचा उपासा या घाटावरून होत असल्याचं चित्र आहे.  महसूल विभागाच्या आशिर्वादाने वाळू उपसा केला जातोय. स्थानिक पोलिसांनी वाळू उत्खननावर छापेमारी केली. मुद्देमालासह वाळू जप्त करण्यात आली. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी…

अधिक वाचा

महसुल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच शेकापुर बाई घाटात वाळूची तस्करी 

राज्य शासनाचे वाळू धोरण अद्याप जाहीर झाले नाही. परिणामी वाळू तस्करांचा धुमाकूळ राज्यभरात सुरूच आहे. हिंगणघाट येथील वाळू तस्करांकडून नुकतेच 22.61 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. विना परवानगी शेकापुर बाई नदीला पोखरण्याच्या घटना उघड झाल्या आहे. मात्र, त्यानंतरही अजूनही वाळू तस्कर सक्रिय आहे. वर्धा : वणा नदीच्या शेकापुर बाई घाटातून वाळूची चोरी सर्रास चोरी केली जात…

अधिक वाचा

यशवंत पंचायतराज अभियानात तिवसा पंचायत समिती अमरावती विभागातुन प्रथम

अमरावती : यशवंत पंचायतराज अभियान सन 2024-25 अंतर्गत अमरावती विभागाचा निकाल विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती व्दारे जाहीर झाला असुन, त्यानुसार विभागातील 56 पंचायत समित्यांपैकी पंचायत समिती, तिवसा ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असल्याने पंचायत समिती तिवसा 11 लाख रुपयाचे बक्षीसाकरीता पात्र ठरली आहे. महाराष्ट्र शासनाव्दारे दरवर्षी यशवंत पंचायतराज अभियान बक्षीस योजना राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या…

अधिक वाचा

जुने वाहन स्क्रॅप केल्यास 15 टक्के कर सवलत

मुंबई : स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना 15 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.    नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रावर (आरव्हीएसएफ) परिवहन प्रकारातील वाहनांना नोंदणीपासून 8 वर्षांच्या आत वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास तसेच परिवहनेतर प्रकारातील वाहनांना नोंदणी पासून 15…

अधिक वाचा

लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये ‘बाईक टॅक्सी’ धावणार

मुंबई : राज्यात नागरिकांना नाविन्यपूर्ण परिवहन सेवेच्या सुविधा देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. याअंतर्गत नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळण्यासाठी बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार असून याबाबतच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रस्त्यावरील वाहन…

अधिक वाचा

महाराष्ट्रात गुजरात मॉडेल राबवण्याचा आरएसएसचा डाव 

मुंबई : राज्यात नरेंद्र मोदी धार्मिक, जातीय तेढ निर्माण करायला आले आहेत, असे वाटते. नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या खुशीत हिंदुत्ववाद्यांनी धार्मिक तेढ वाढवण्यासाठी बीडमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर एका मशिदीत जिलेटिनचा स्फोट घडवला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, यात दोन आरोपींना पकडले गेले. दुसऱ्या बाजूला, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंहचा मालेगावातच आज जाहीर सत्कार करून ‘हिंदूवीर’…

अधिक वाचा

धर्माच्या आधारे देश उभा राहू शकत नाही; जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका

लोकांना धर्माच्या आधारे भडकवलं जात आहे आणि त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून केला आहे. मुंबई : आपल्या देशातील मूळ प्रश्न बाजूला ठेऊन लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवलं जात आहे. आपली तरूण पीढी याला बळी पडत आहे. धर्माच्या आधारे कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही असं राज ठाकरे म्हणाले. जगातले…

अधिक वाचा

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रामदास आठवलेंची बिहारच्या राज्यपालांची भेट

मुंबई :  महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावा  या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी बिहार चे राज्यपाल महामहीम मोहम्मद आरिफ खान यांची पटना येथील राजभवन येथे भेट घेतली.बुद्धगया मधील महाबोधी महाविहार हे जागतीक स्तरावर बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे.त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात…

अधिक वाचा

चॅटजिपीटी वापरून घिबळी स्टाईल फोटोचा समाजमाध्यमांवर ट्रेंडिंग

देशात झपाट्याने तंत्रज्ञान बदलत असतांना, नुकतेच चॅटजिपीटीचा वापर करून घिबळी स्टाईल फोटो बदलवण्याचा ट्रेंन्ड सुरू आहे. यामध्ये पंतप्रधानांसह देशभरातील नेते, सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. समाजमाध्यमांवरील प्रत्येक सोशल हँन्डलवर घिबळी स्टाईल फोटो दिसून येत आहे. अनेक जण आपल्या परिवारासोबतचे फोटो घिबळी स्टाईल करून समाजमाध्यमांवर व्हायरल करतांना दिसून येत आहे.

अधिक वाचा

शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार

मुंबई : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात  याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. गुढीपाडवा नव्या शुभारंभाचा असं टीजरमध्ये सांगत हिंदुत्व, मराठी अस्मिता, सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका,…

अधिक वाचा
WhatsApp Floating Button Join Group