मुंबई : नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथाल हरिदास विश्वंभर बोंबले या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. नापिकी, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, सरकारी मदत नाही आणि सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत.

हरिदास बोंबलेची आत्महत्या ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आहे. सरकारने कुंभकर्णी झोपेतून आणि राक्षसी बहुमताच्या नशेतून बाहेर पडून निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली आहे.