मुंबई : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना ऊर्जा देऊ नका, हा माणूस घात करेल हे सांगणारे ठाण्यातील लोक त्यांच्याच अवतीभोवती आहेत असा दावा केला आहे. यानंतर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावं लागत आहे. पण माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नको असं सांगणारे फोन संजय राऊतांनी केला होता असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी आपल्याला भेटायला बोलावलं होतं असंही सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर रोज मला फोन करत होतात. एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावं लागत आहे. पण माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नको हे तुम्ही मला स्वत: फोन करुन सांगत होता. विसरलात का ? ही बंद मूठ उघडली तर तुम्हालाच भारी पडेल,” असा इशारा नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना दिला आहे.