मुंबई : Mumbai’s ‘Red Fairy’ is now in the museum! मुंबईच्या रस्त्यांवर गेली १५ वर्षे धुरळा उडवत धावलेली आणि मुंबईकरांच्या मनात घर करून राहिलेली ४००७/BM/A ही अशोक लेलँड रुटमास्टर-शैलीतील डबल-डेकर बस आता केवळ एक बस राहिली नसून, तिला ऐतिहासिक स्थान मिळाले आहे. ही ‘लाल परी’ आता ‘संग्राहिका’ म्हणून पुनर्जन्म घेत आहे. विशेष म्हणजे, हे भारतातील पहिले ‘संग्रहालय-ऑन-व्हील्स’ (Museum-on-wheels) आहे.
ही बस आता चालते-बोलते संग्रहालय Mumbai’s ‘Red Fairy’ is now in the museum!
बेस्ट (BEST) संग्रहालयाच्या अणिक डेपो येथे ही बस आता चालते-बोलते संग्रहालय बनली आहे. मुंबईतील डबल-डेकर बसचा समृद्ध वारसा, मनोरंजन क्षेत्रात तिचे स्थान आणि जागतिक इतिहास या सर्वांचे दर्शन येथे घडवले जाणार आहे. यतीन पिंपळे (क्युरेटर) आणि अंबादास गारजे (सहाय्यक) यांच्या मार्गदर्शनाखाली, बेस्टच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी आणि अनेक बसप्रेमींच्या मदतीने या बसचे जतन आणि पुनर्निर्माण करण्यात आले आहे.
Mumbai’s ‘Red Fairy’ is now in the museum! इतिहासाची एक झलक
मुंबईतील वाढती गर्दी आणि वाहतुकीच्या समस्यांवर उपाय म्हणून, १९३७ मध्ये शहरात पहिली डबल-डेकर बस दाखल झाली. ७५ प्रवाशांची क्षमता, कमी वाहतूक खर्च आणि कमी जागेत अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता यामुळे ती मुंबई शहराच्या गरजांसाठी अगदी परिपूर्ण ठरली.
लंडनच्या रुटमास्टरची प्रेरणा
या डबल-डेकर बसेसना लंडनच्या प्रसिद्ध ‘रुटमास्टर’ बसची प्रेरणा मिळाली होती. लाल रंग, मागचा मोकळा दरवाजा असलेला प्लॅटफॉर्म आणि निमुळते ड्रायव्हर केबिन ही तिची मुख्य वैशिष्ट्ये होती. लंडनच्या रुटमास्टरप्रमाणेच तिची भारतीय आवृत्ती तयार झाली, पण ती भारतीय रस्त्यांसाठी खास वैशिष्ट्यांसह होती.