बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान बोगद्याचा पहिला ब्रेकथ्रू
मुंबई : Mumbai-Ahmedabad Bullet Train project मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आता एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते शिळफाटा दरम्यान होणाऱ्या बोगद्याचे पहिले यशस्वी ब्रेकथ्रू मिळाला आहे. हा बोगदा एकूण २१ किलोमीटर लांब आहे, त्यातील २.७ किलोमीटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असून, ठाणे खाडीखाली ७ किलोमीटरचा समुद्राखालील भागही यामध्ये समाविष्ट आहे.
बोगद्याचे बांधकाम दोन पद्धतींनी होत आहे Mumbai-Ahmedabad Bullet Train project
• NATM (New Austrian Tunneling Method) – शिळफाटा ते घणसोली या ५ किलोमीटरच्या भागासाठी
• TBM (Tunnel Boring Machine) – उर्वरित १६ किलोमीटरसाठी काम जलद करण्यासाठी ADIT अतिरीक्त बोगदा निर्माण करण्यात आला, ज्यामुळे एकाच वेळी दोन बाजूने उत्खनन शक्य झाले.