मुंबई : MP Varsha Gaikwad receives Sansad Ratna Award मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या खासदार, प्रा. वर्षा एकनाथराव गायकवाड यांना संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित संसदरत्न पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मानित करण्यात आले.
सदैव कार्यरत राहू MP Varsha Gaikwad receives Sansad Ratna Award
या पुरस्काराने आपली जबाबदारी आणखी वाढल्याचे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा क्षण आहे. हा पुरस्कार केवळ माझा नसून, मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.” मुंबईकरांनी ज्या विश्वासाने त्यांना लोकसभेत निवडून पाठवले, त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
गायकवाड यांनी पुढे सांगितले की, “जनतेचे प्रेम, त्यांची आपुलकी आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास यामुळेच मला हा बहुमान मिळाला आहे.” हा सन्मान त्यांनी मुंबईच्या जनतेला अर्पण केला. त्या म्हणाल्या, “हा सन्मान मला जनतेचे आणि माझ्या पक्षाचे विचार लोकसभेत अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रेरणा देईल.” संसदेत मुंबईकरांचे प्रश्न यापुढेही अधिक सक्षमपणे मांडत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या पुरस्कारामुळे त्यांना आपले कार्य आणखी जोमाने पुढे नेण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला