मंगेशकर हॉस्पिटलला थकीत कर भरण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम

Share

मुंबई : लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशन यांच्या रुग्णालय असलेल्या इमारतींवर 22 कोटी 6 लाखांची पुणे महानगरपालिकेची कर थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणात आधीच 2017 मध्ये न्यायालयात याचिका सुद्धा दाखल झाली असून, एका महिलेच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणानंतर आता रुग्णालयाला 7 एप्रिल रोजी थकीत कर रक्कम भरण्याचे आदेश देऊनही रुग्णालयाचे धनंजय केळकर यांनी कर भरणा केला नसल्याने अखेर पुणे मनपा प्रशासनाने मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे.

या नोटीस मध्ये 2024-25 अखेर थकबाकी रक्कम 27 कोटी 38 लाख 72 हजार होती. मात्र, त्याविरुद्ध वर्ष 2016-17 मध्ये मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने कर आकारणी मान्य नसल्याने पुणे महानगरपालिका विरोधात दावा दाखल केला होता. दरम्यान उच्च न्यायालयाने जनरल टॅक्सच्या 50 टक्के रक्कमेसह उर्वरित इतर कर भरण्याबाबत कोर्ट आदेश दिले होते.

न्यायालयाच्या आदेशानंतर उर्वरीत 22 कोटी 6 लाख रुपये अद्याप मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर थकीत आहे. याप्रकरणात आता पुणे महानगरपालिका प्रशासनाने थेट नोटीस बजावत दोन दिवसात कर भरणा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पुणे महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. 





Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group