मुंबई : (mandal commission) ओबीसींना संविधानिक अधिकार बहाल करणारा मंडल आयोगाच्या अंमलबजावणी पासून ते आजपर्यंत विविध माध्यमातून योगदान देत असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करीत आहोत. तरी आपण आम्हाला माहिती गोळ्या करण्यास मदत करावी ही नम्र विनंती राम वाडीभस्मे यांच्याकडून करण्यात आले आहे.
1990 पूर्वीच्या चळवळीत सहभागी असणाऱ्या माहिती नोंदवता येणार (mandal commission)
ओबीसींना संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी हा भारतीय समाजाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. 1990 च्या आधीपासून ते आजपर्यंत सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, शिक्षक, वकील, विद्यार्थी, पत्रकार, साहित्यिक, चित्रपट आणि सांस्कृतिक आदि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या ऐतिहासिक लढ्यात मोलाचे योगदान दिले/देत आहे.

असा आहे उद्देश
आमचे उद्दिष्ट आहे की, या योगदानाची नोंद घेऊन, ती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या इतिहासाची रचना करणे. यासाठी आम्ही ओबीसींशी संबंधित चळवळीत सहभागी व्यक्तींबद्दलची माहिती गोळा करण्यासाठी सर्व स्तरांवरील व्यक्तींना सहकार्याचे आवाहन करत आहोत.
माहिती गोळा करण्याचे उद्दिष्ट
- सामाजिक योगदानाची नोंद घेणे: मंडल आयोग चळवळीत योगदान देणाऱ्यांची कार्याची नोंद करून ती इतिहासात सामाविष्ट करणे.
- प्रेरणादायी व्यक्तींची ओळख: त्यांच्या योगदानाबद्दल लेख, मुलाखत, माहितीपट आणि संशोधन प्रकल्प तयार करणे.
- भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा: या चळवळीत सहभागी झालेल्या/असलेल्या व्यक्तीच्या कार्यामुळे सण १९९३ पासून मागील ३० वर्षात ओबीसी वर्गातील पालक आणि विद्यार्थी यांची शिक्षण व नौकरी क्षेत्रात त्यांचा प्रतिनिधित्व आणि वाटा ह्याच्यात झालेली प्रगती निदर्शनास आणणे. व ती पुढे टिकवून ठेवून पूर्णत्वास नेण्याकरिता अशा व्यक्तीच्या कार्याचा गौरव करणे व तो पुढील पिढ्यासाठी मार्गदर्शक बनवणे.
आपल्याकडे माहिती असल्यास कसे पाठवावे ?
जर आपण या ऐतिहासिक चळवळीचा भाग असाल किंवा अशा व्यक्तींची माहिती असेल, तर कृपया खालील👇🏻Google फॉर्मद्वारे माहिती भरून पाठवावी, ही विनंती.
Google Form Link: https://forms.gle/WXk2DikLsagS1qeS6
आपल्या सहकार्यामुळे समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला ओळख मिळेल आणि भविष्यातील ओबीसी जनतेसाठी एक प्रेरणा निर्माण होईल.
- राम वाडीभष्मे
- ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ
- 8796455216