सहाय्यक आणि मोटार वाहन निरिक्षकांचा ऑनलाइन बदलीला विरोध; समान संधी, सर्वांना न्याय मिळत नसल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप
मुंबईः (maharashtra transport) राज्यातील मोटार वाहन निरिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन बदलीसाठी विरोध केला आहे. ऑनलाईन बदली प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या बदली अधिनियम २००५ आणि समोपदेशनाने बदली २०१८ या धोरणाशी सुसंगत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्याशिवाय, सहाय्यक आणि मोटार वाहन निरिक्षकांकडूनच या बदली प्रक्रियेला विरोध केला जात असून, राज्याचे परिवहन अपर मुख्य सचिवांकडे अनेक तक्रारी दाखल केली आहे.
दुर्धर आजार, नक्षलग्रस्त आणि पती-पत्नी एकत्रीकरणाचा नियम भंग (maharashtra transport)
ऑनलाईन बदली प्रक्रियेमूळे समान संधी, न्याय सर्वांना मिळत नसल्याचा आरोप अधिकार्यांकडून केला जात आहे. त्याशिवाय, अधिनीयमानुसार प्राधान्य क्रम लावतांना अधिकारी स्वतः किंवा अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यास किंवा पती, पत्नी शासकीय सेवेत असल्यास, अधिकारी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असल्यास त्यांना प्राधान्य क्रम देणे बंधनकारक आहे.मात्र, ऑनलाइन बदली प्रक्रियेमध्ये राज्याच्या बदली अधिनियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे.
बदली प्रक्रियेमध्ये नागरि सेवा मंडळांतर्गत मानवी दृष्ट्रीकोण, कार्यालयाची आवश्यकता आणि अधिकार्यांची सोय असा विचार करून बदलीची शिफारस केली जाते. मात्र, ऑनलाइन बदली प्रक्रियेत कुठेही नागरी सेवा मंडळाला स्थान दिसून येत नाही. त्य़ाशिवाय, ऑनलाइन बदलीसाठी लावण्यात आलेली सेवा जेष्ठता यादी सुद्धा सदोष असल्याचा आरोप सुद्धा अधिकाऱ्यांनी केली आहे. तर यावर्षीची मोटार वाहन निरिक्षकांची अद्याप अंतमी सेवा जेष्ठता यादी सुद्दा प्रसिद्ध केली नसल्याने आगामी बदल्या प्रचलित पद्धतीने बदली अधिनियमाप्रमाणेच पार पडावी अशी मागणी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
ऑनलाइन बदलीप्रक्रिया सदोष
– २०२५ ची सेवा जेष्ठता यादी ऐवजी २०२४ ची तात्पुरती मोटार वाहन निरिक्षकांच्या यादीचा बदलीसाठी वापर
– बदलीच्या शेवटच्या क्रमांकावर असलेल्या अधिकाऱ्यांना विकल्प/संधी राहणार नाही
– ऑनलाइन बदली फक्त सहाय्यक आणि मोटार वाहन निरिक्षक या दोनच संवर्गांना बंधनकारक कसे, इतर संवर्गातील अधिकाऱ्यांना ऑनलाइनचे बंधन नाही
– मोटार वाहन निरिक्षक पदाच्या गटाचा घोळ असतांना, बदली अधिनीयम २००५ किंवा समुपदेशन धोरण २०१८ ने करायच्या याबाबात संभ्रमावस्था
विनंती बदलीचे मोठ्या प्रमाणात अर्ज
वर्ष 2023 मध्ये 156 मोटार वाहन निरिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या पार पडल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. नापंसतीच्या आणि कुटूंबाच्या दृष्ट्रीने चुकीच्या ठिकाणी बदली झाली म्हणून तब्बल 87 अधिकारी विनंती अर्ज केले होते. तर यावर्षी सुद्धा ऑनलाइन बदल्यामुळे घोळ होईल असे वाटत असल्याने सुमारे 70 लोकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केल्याचे परिवहन विभागातील एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.