बुलढाणा : (maharashtra farmer) यावर्षीच्या पावसाळ्याचा अंदाज बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घट मांडणीत पुंजाजी महाराजांनी शेतकऱ्यांना चिंतेत पाडणारे भाकीत केले आहे. यावर्षीच्या पावसाळी ऋतूमध्ये पावसाची अनिश्चितता राहणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. त्यामुळे 7 जुन च्या मृगनक्षत्रानंतर लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. अन्यथा शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम (maharashtra farmer)
साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखात आज बुलढाणा जिल्ह्याच्या भेंडवळ येथील घट मांडणीचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. या भाकित्वाद्वारे पिकाची परिस्थिती ही सर्वसाधारण राहणार असल्याची माहिती पुंजाजी महाराज यांनी दिली. तसेच पाऊस सुद्धा सर्वसाधारण आणि अनिश्चित दाखवण्यात आलेला आहे.
युद्ध होणार नाही
पृथ्वीचा काही भागही नष्ट होईल पंतप्रधान तनावात राहील. देशात युद्धजन्य परिस्थिती होईल मात्र युद्ध होणार नाही. पृथ्वीचा काही भाग नष्ट होईल. राजा म्हणजे पंतप्रधान तनावात राहील. देशावर मोठ संकट येण्याची शक्यता महाराजांनी वर्तवली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र युद्ध होणार नाही. असही भाकीत वर्तवण्यात आल आहे.