मान्यमारमध्ये शुक्रवारी दुपारी ७.७ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

२८ मार्च २०२५ रोजी मध्य म्यानमार एका मोठ्या भूकंपाने हादरले. ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात भीती पसरली. शुक्रवारी मध्य म्यानमारमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी १२:५० वाजता ७.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आणि त्यानंतर ६.८ रिश्टर स्केलचा आणखी एक भूकंप झाला.

अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार भूकंपाचे केंद्र सागाईंग शहरापासून १६ किलोमीटर वायव्येस होते आणि त्याची खोली १० किलोमीटर होती.
या भूकंपाचे धक्के थायलंडची राजधानी बँकॉकपर्यंत जाणवले, ज्यामुळे तिथेही घबराट पसरली. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आणि मोठ्या संख्येने लोक प्रभावित झाल्याचे वृत्त आहे.

थायलंड, चीन आणि भारतापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवलेम्यानमार व्यतिरिक्त, भूकंपाचे धक्के उत्तर थायलंड, चीनमधील युनान प्रांत आणि भारतातील कोलकाता आणि मणिपूरपर्यंत जाणवले.
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मेट्रो आणि रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत. चीन भूकंप देखरेख केंद्राने (CENC) सांगितले की, भूकंपाची तीव्रता ७.९ होती.
भारतातही दिसून आला त्याचा परिणाम
भारतातही त्याचा परिणाम दिसून आला. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि मणिपूरच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
बचावकार्य सुरू, अनेक जखमी
म्यानमारमधील नेपिदाव येथे अनेक ऐतिहासिक इमारती आणि बौद्ध मठांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मदत आणि बचाव पथके ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.