गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा सहभाग
खेड : Spontaneous response to ‘Lions Varsha Marathon 2025’ शहरातील लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि मुकादम डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लायन्स वर्षा मॅरेथॉन 2025’ या उपक्रमाला आज खेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘Run for Health’ या संकल्पनेवर आधारित ही मॅरेथॉन सकाळी 7 वाजता मुकादम लँडमार्क येथून सुरू झाली.
गृहराज्यमंत्र्यांनी मॅरेथॉन मध्ये घेतला भाग Spontaneous response to ‘Lions Varsha Marathon 2025’
या उपक्रमात महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतः सहभाग घेत समाजात आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्याचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी मॅरेथॉनमध्ये धावत भाग घेत तरुणाईला सशक्त आणि निरोगी महाराष्ट्र घडवण्याचे आवाहन केले.
मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील नागरिकांनी सहभागी होत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले होते. सर्व सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट आणि सर्टिफिकेट देण्यात आले. तसेच विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन महेंद्र शिरगांवकर, मुकादम डेव्हलपर्सचे शाहरुख मुकादम, क्लबचे सर्व पदाधिकारी, रोहन बिचारे, विजयराज म्हात्रे, आशिष परशार आणि ओम नाथव यांनी अथक मेहनत घेतली.
या मॅरेथॉनच्या माध्यमातून खेड परिसरात आरोग्याबाबत जनजागृती घडवून आणण्यात यश आले असून नागरिकांनी पुढील काळातही असे सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.