राज्यस्तरीय बैठकीत महाराष्ट्र जलजीवन मिशन संघटना स्थापन, संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून इंजिनीयर मिलिंद भोसले यांची एकमताने निवड
मुंबई : Jaljeevan Mission Contractors Association established in Maharashtra महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाच्या बाबत सातारा येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील जलजीवन मिशन मध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी २५ जिल्ह्यातील राज्य प्रतिनिधी सदर बैठकीस उपस्थितीत राज्य जलजीवन मिशन संघटना स्थापन करण्याचा निर्णय एक मुखाने घेण्यात आला.
बैठकीतूनच थेट मंत्री गुलाबराव पाटील यांना फोन Jaljeevan Mission Contractors Association established in Maharashtra
या बैठकीमध्ये चालू असताना राज्याचे स्वच्छता मंत्री व जलजीवन मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजिनिअर मिलिंद भोसले यांनी संपर्क साधला व सातारा येथील बैठक आयोजित केलेली आहे. या जल जीवन मिशनच्या कंत्राटदाराची प्रलंबित देयके व इतर प्रश्न तातडीने सोडवण्याबाबत त्यांना विनंती केली.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी विनंती मान्य करत आपल्या स्तरावर ती लेखी स्वरूपात जलजीवन मिशन संघटना पत्रावर मागण्याचा प्रस्ताव माझ्या कार्यालयास तातडीने सादर करण्याचे आदेश दिले. यामुळे पुढील काळामध्ये देशाचे केंद्रीय जलजीवन मिशनचे मंत्री सी आर पाटील व गुलाबराव पाटील यांना महाराष्ट्र जलजीवन संघटना ही व्यवस्थित स्वरूपाचा प्रस्ताव दाखल करेल आणि येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व कंत्राटदारांची राज्यातील जवळपास १२ हजार कोटीचे देयके व इतर गोष्टींच्या आणि अडचणी सोडवण्याबाबत तातडीने पावले उचलतील असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
२५ जिल्ह्यांच्या उपस्थितीमध्ये राज्य शासनाला सुद्धा जनजीवन मिशन अंतर्गत काम केलेलं कंत्राटदरानी सुद्धा एक निर्वाणीचा इशारा सदर बैठकीत एक मुखाने देण्यात आलेला आहे. बैठकीस महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले महासचिव सुनील नागराळे, राजेश देशमुख, कांतीलाल डुबल, कैलास लांडे, नरेंद्र भोसले, प्रशांत कारंडे, सातारा जिल्हा महासंघाचे अध्यक्ष सिकंदर डांगे. तसेच सातारा जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर संघटना अध्यक्ष प्रशांत भोसले, संजय जाधव महेश घाडगे, सुभाष ओंबळे ,अविनाश गाढवे, युवराज पवार, अविनाश माने, समाधान घोरपडे, मधुकर मोहिते, रमेश जाधव, विकास भोईटे, नागेश पवार तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.