मुंबई : (IPL2025) मुंबई आणि राजस्थान रॉयल यांच्या IPL सामन्यांमध्ये मुंबईने जोरदार मुसंडी मारत राजस्थान रॉयलचा पराभव केला आहे. मुंबईने सलग सहा सामने जिंकले असून संघ पॉइंट टेबलचे अव्वलस्थान पटकावले आहे. तर राजस्थान रॉयल थेट आयपीएल सामन्यातून बाहेर पडले आहे.
100 धावांच्या फरकाने मुंबईने जिंकला सामना (IPL2025)
“जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईने 20 षटकांत 2 बाद 217 धावा केल्या. 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान संघाचा डाव 16.1 षटकात 117 धावांवर संपला. ट्रेंट बोल्ट आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या. राजस्थानचा एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.”
“मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 48 धावा करत नाबाद राहिले. दोघांनीही 94 धावांची नाबाद भागीदारी केली. सलामीवीर रायन रिकेल्टनने 61 धावा आणि रोहित शर्माने 53 धावा केल्या. रियान पराग आणि महिष तीक्षणा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.”