मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरू
मुंबई : ताडदेवचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यावर क्राइम इन्वेस्टिगेशन ब्यूरो यांनी भ्रष्टाचार, घोटाळ्याबद्दल उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली असून सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयातील दोन माजी न्यायाधीश व राज्याचे माजी महासंचालक यांनी याचिकेतून कळसकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे. याचिकेमधून त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या परिवहन विभागाच्या घोटाळ्यात भ्रष्टाचाराची सखोल चौकशी सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
रडार कॅमेरा घोटाळा
रडार कॅमेरा घोटाळा मध्ये एकूण 69 स्कॉरपियो इंटरसेप्टर गाड्या नवीन घेण्यात आल्या ज्यामध्ये एक गाडी रुपये 12 लाखाला प्रत्येक स्कॉरपियोवर एक रडार कॅमेरा हा 10 लाखाच्या आसपास मिळतो त्याची किंमत 33 लाख घेण्याची तरतूद केली आहे. हे काम नाशिकच्या अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीच्या नावे वर्क ऑर्डर काढण्यात आले. ही कंपनी कंस्ट्रक्शन कंपनी असून, हायवे व पूल बनवण्याचे करते. यांना ही काम देण्यात आले. व दोन डुप्लीकेट कंपणी उभे करून टेंडर भरण्यात येऊन त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते.
एचएसआरपी नंबर प्लेट घोटाळा
नंबर प्लेट घोटाळा सदर घोटाळ्याबाबत माहे मार्च 2025 च्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, अमर सत्यजित तांबे, अमोल कोल्हे अशा अनेक विधानसभा सदस्य व खासदारांनी नंबर प्लेट घोटाळा चौकशीची मागणी केली आहे. गुजरात व इतर राज्यांमध्ये 160 ने नंबर प्लेट उपलब्ध आहे. ती महाराष्ट्र राज्यात 450 ते 850 रुपयांना विक्रीसाठी दर निश्चित केले. त्याच्यामध्ये प्रत्येक नंबर प्लेट मागे भरत दिनकर कळसकर यांनी 30 किक् बॅग प्रत्येक नंबर प्लेटमागे घेऊन भ्रष्टाचार केल्याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस घोटाळा
GPRS किट घोटाळा या मध्ये GPRS किटचे दर जास्त ठेऊन प्रत्येक GPRS किट किंमत मागे किक बॅग घेतली यामध्ये GPRS किटचा घोटाळा करून यामध्ये श्री भरत दिनकर कळसकर यांची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मोटर वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी यापूर्वी भरत दिनकर कळसकर यांच्यावर उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे व यामध्ये भरत दिनकर कळसकर हे अधिकाऱ्यांकडून लाच व खंडणी मागतात याची सखोल चौकशीची मागणी केली आहे. या संबंधित पाटील यांनी नाशिक येथील पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून चौकशीसाठी SIT नेमण्यात आली आहे.
कळसकरांच्या पदोन्नतीवर प्रश्नचिंन्ह
सातारा आरटीओ कार्यालयात कार्यरत डेप्युटी आरटीओ खडसे यांनी सुद्धा राज्य शासनाकडे तक्रार करून कळसकर यांच्या रडार घोटाळ्याची चौकशी मागणी केली आहे. अशा परिस्थितीत कळसकर यांच्या पदोन्नतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. कळसकर यांच्या विरुद्ध घोटाळे आणि भ्रष्टाचाराची याचिका दाखल असतांना, नियम मोडून त्यांना पदोन्नती दिल्यास त्यालाही उच्च न्यायालयात हरकत नोंदवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.