मुंबई : (harijan sevak sangh) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात प्रचार, प्रसाराचे काम करणार harijan sevak sangh
हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि शाळा चालविल्या जातात. तसेच ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, अभ्यासिका चालविल्या जातात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसाराचे कार्य हरिजन सेवा संघातर्फे करण्यात येते त्याचा विस्तार आगामी काळात केला जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले.
हरिजन सेवक संघाच्या स्थापनेला यंदा ९३ वर्षे झाली आहेत. ही संस्था शताब्दी कडे वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने सेवक संघात सर्व जाती धर्माच्या युवक, युवतींचा सहभाग वाढावा, त्यादृष्टीने प्रयत्न रहातील आणि युवा वर्गाकडून नवनवीन कल्पना घेऊन कार्याला आधुनिकतेची जोड दिली जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले.
गांधीवादी नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्षपद अनेक वर्षे भूषविले आणि सेवक संघाच्या महाराष्ट्रातील कार्यात मोलाचे योगदान दिले. हरिजन सेवक संघाचा कारभार आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरला असून, अनेक विचारवंत, संशोधक, सामाजिक आणि राजकीय नेते यात सहभागी आहेत.