Giving Priority to People’s Work Ensures Their Unwavering Support लोकांच्या कामांना प्राधान्य दिल्यास लोक पाठीशी ठामपणे उभे राहतात: अजितदादा पवार

Ajit Pawar
Share

मुंबई: Giving Priority to People’s Work Ensures Their Unwavering Support राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, लोकांची कामे केली तरच लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांच्या अडचणी सोडवून त्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा सल्ला दिला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील देवळाली आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (उबाठा), शरदचंद्र पवार गट आणि वंचित आघाडीच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बेघरांना घरकुलांचा लाभ मिळणार Giving Priority to People’s Work Ensures Their Unwavering Support

या पक्षप्रवेश सोहळ्यात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी आणि युवकांसाठी कुशल रोजगाराच्या अनेक योजना राबवत आहे. केंद्र सरकारने राज्याला २० लाख घरांचे उद्दिष्ट दिले आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून पक्ष वाढीला हातभार लागेल. देशाच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाली तरी अजूनही अनेक लोक बेघर आहेत. त्यांना या घरकुल योजनेचा निश्चित लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, जेव्हा त्यांचा पराभव होतो तेव्हा ते निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर निवडणूक आयोगाचे कौतुक करतात. निवडणूक आयोग जर चुकीचा असेल तर न्यायव्यवस्था आहे ना, असा संतप्त सवाल त्यांनी केला. बारामतीमधून मी अनेक निवडणुका सलग जिंकलो आहे, त्यावेळी असे काही घडले नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेतकरी संघाचे नाशिक तालुकाध्यक्ष शरद गायके, शरदचंद्र पवार गटाचे नाशिक तालुकाध्यक्ष विष्णू थेटे, सचिन पिंगळे तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते कृष्णा काशीद यांचा समावेश होता.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group