56 टक्के वेतनामुळे छत्रपती संभाजी नगर आगारातील कर्मचाऱ्यांचा पहिला बळी

Share

मुंबई : छत्रपती संभाजी नगर आगार क्रमांक एक मधील कर्मचारी चालक मशना मारुती कांबळे वय 49 राहणार मारतोली तालुका देगलूर जिल्हा नांदेड यांचे शुक्रवारी कर्तव्यावर असतानाच आर्थिक विवंचनेतून हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. 

कांबळे  यांचे नियमित कर्तव्य अहमदपूर छत्रपती संभाजी नगर असताना रात्री तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली. 56 टक्के वेतन मिळाल्यामुळे कांबळे विवंचनेत होते. घरखर्च आणि तीन दिवसांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव अशा विचारात असतांना कांबळे यांना हा झटका आला असे त्यांचे सहकारी सांगतात.  

त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई एक लहान मुलगा पत्नी असा परिवार आहे. असे अपुरे वेतन देऊन एसटी महामंडळ अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी घेणार असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाअसल्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी सांगितले आहे. 


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group