Dr.Babasaheb Ambedkar; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे राज्य सरकारने केले प्रकाशन

Share

मुंबई : (Dr.Babasaheb Ambedkar) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 7, 8 आणि 9 या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात झाले.

जनता खंड ची निर्मिती (Dr.Babasaheb Ambedkar)

डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8, 9 ची निर्मिती करण्यात आली आहे. कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, समितीचे सदस्य सचिव डॉ प्रदीप आगलावे, सदस्य योगीराज बागुल, ज.वि. पवार, डॉ. संभाजी बिरांजे आदींसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

‘जनता’ हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1930 ते 1956 पर्यंत प्रकाशित झाले होते. ‘जनता’ हे वृत्तपत्र आंबेडकर चळवळीचा दस्ताऐवज आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्व लक्षात घेऊन त्यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डॉ आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनताचे 6 खंड प्रकाशित केले आहेत.

(Dr.Babasaheb Ambedkar) खंडांमध्ये काय असणार

‘जनता’ खंड 7-  या खंडात 12 फेब्रुवारी 1938 ते 28 जानेवारी 1939 पर्यंतच्या एकूण 48 अंकाचा समावेश आहे. ‘जनता’ खंड 8- या खंडात 4 फेब्रुवारी 1939 ते 27 जानेवारी 1940 पर्यंतच्या एकूण ४८ अंकाचा समावेश आहे. ‘जनता’ खंड 9- या खंडात 3 फेब्रुवारी 1940 ते 1 फेब्रुवारी 1941 पर्यंतच्या एकूण 48 अंकाचा समावेश आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group