Dedicated Flower Market Coming Soon to Mumbai मुंबईमध्ये फुलांसाठी स्वतंत्र बाजारपेठ लवकरच

फुलांचे स्वतंत्र बाजारपेठ
Share

मुंबई : Dedicated Flower Market Coming Soon to Mumbai राज्यातील फुले उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबईत फुलांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. फुल हा शेतमाल नियमनाखाली नसल्याने तसेच योग्य बाजारपेठेचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.

नवी मुंबईत बाजारपेठेची जागा शोधणे सुरू Dedicated Flower Market Coming Soon to Mumbai

मंत्री रावल यांनी, दादर, गोरेगाव किंवा नवी मुंबई येथे फुलांच्या बाजारपेठेसाठी जागा शोधून ती तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई हे फुलांचे एक मोठे खरेदी-विक्री केंद्र आहे, जिथे वर्षभर फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे एक सुसज्ज बाजारपेठ असणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी पणन मंत्री रावल यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. या बैठकीत आमदार मनिषा चौधरी आणि पणन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री रावल यांनी, माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजारपेठेची सध्याची जागा लहान असल्याने तिचा पुनर्विकास करून तेथे आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा पर्याय सुचवला. जर ही जागा अपुरी पडत असेल, तर गोरेगाव किंवा नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्यावर विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. परळ येथील कामगार मैदानावर सकाळी ५ ते ९ या वेळेत जागा उपलब्ध होऊ शकते का, याचाही विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की, पॉलिहाऊस आणि शेडनेटमध्ये दर्जेदार फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात एक अत्याधुनिक कट फ्लॉवर्स बाजार असणे महत्त्वाचे आहे. फुलांची निर्यात वाढवण्यासाठीही अशा बाजारपेठेची आवश्यकता आहे. या निर्णयामुळे फुल उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group