एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केली प्रेसनोट
मुंबई : covid कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविड साठी महाराष्ट्रामध्ये ILI (Influenza like Illness) आणि SARI (Severe Acute Respiratory Infection) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. सदर कोविड रुग्णांना पॉझीटीव आल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड रूग्णांमध्ये काही प्रमाणात निश्चितपणे वाढ दिसून येत आहे. तसेच कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेला आवाहन करण्यात येते की कोणीही घाबरून जाऊ नये.
आतापर्यंत २५१९९ कोविड चाचणी covid
जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत २५१९९ कोविड चाचणी संख्या आहे. तर यामध्ये २३१८ पॉझीटीव रुग्ण आढळून आले आहे. आज रोजी पर्यंत १९६२ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.६४ टक्के इतके आहे. २१.०६.२०२५ रोजी पॉझीटीव रुग्ण ३७ आहेत. त्यामध्ये मुंबई – १९, ठाणे मनपा २, पनवेल मनपा-१, पुणे मनपा ७, सांगली१, सांगली मनपा-१, अकोला मनपा-१, नागपूर मनपा – ५ समावेश आहे. तर आज रोजी सक्रीय असलेले रुग्ण-३२४ आहेत. जानेवारी २०२५ पासून मुंबई मधील एकूण रुग्ण संख्या – ९४२ तर जानेवारी – १, फेब्रुवारी १, मार्च ०, एप्रिल ४, मे ४३५, जुन- ५०१ सर्व निदान झालेले रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे आहेत. तर आज पर्यंत सद्व्याधीने ग्रस्त असलेले ३१ व इतर १ असे एकूण ३२ रुग्ण दगावले आहेत.
३२ मृतकांमध्ये या प्रकारचा आजार
- नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सीझर
- कर्करोग
- ब्रेन स्ट्रोक (Cerebrovascular Disease)
- डायबेटिक किटोएसिडोसिस (DKA with LRTI)
- ILD (Interstitial Lung Disease)
- डायबेटीस व २०१४ पासुन अर्धांगवायू झालेला होता.
- Severe ARDS with dilated aortic regurgitation.
- मधुमेह
- मधुमेह व उच्च रक्तदाब
- हृदयविकार, फुप्फुसाचा आजार
- उच्च रक्तदाब, Parkinson’s Disease
- मधुमेह, उच्च रक्तदाब व Chronic Renal Failure.
- सदर रुग्ण immunocompromised होता व त्यांना हृदयविकार (IHD) व टीबी, हा आजार होता.
- हृदयविकार (बायपास सर्जरी), फुप्फुसाचा आजार (ILD)
- मधुमेह, उच्च रक्तदाब
- उच्च रक्तदाब, मधुमेह, CVA, hypothyroidism
- सदर रुग्ण immunocompromised होता व त्यांना हृदयविकार (Right Ventricular Dysfunction) होता.
- मधुमेह, उच्च रक्तदाब, व हृदयविकार (IHD)
- मधुमेह व Parkinson’s Disease
- मधुमेह, उच्च रक्तदाब
- हृदयविकार (Angioplasty), किडनी चा आजार, क्षयरोग
- कर्करोग, हृदयविकार (Right Ventricular Dysfunction)
- हृदयविकार (Left Ventricular Dysfunction), Obesity
- मधुमेह, उच्च रक्तदाब
- कर्करोग, रक्तक्षय
- यकृत विकार (liver Cirrhosis)
- यकृत विकार (Chronic liver Disease)
- फुप्फुसाचा आजार (ILD), उच्च रक्तदाब, मधुमेह.
- मेंदूज्वर (Viral Meningitis),
- डायलेसिस, मधुमेह, उच्च रक्तदाब, Renal Failure
- इतरमध्ये ४७ वर्षीय महिला असून, सदर महिलेस ताप आणि धाप लागणे हि लक्षणे होती.
राज्यस्तरावरील कोविड १९ आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
१. इनफ्लूएंझा सदृश्य (ILI) व श्वसनाचा तिव्र दाह असलेले रुग्ण (SARI) यांचे नियमित सर्वेक्षण करण्यात यावे.
२. ५% ILI रुग्ण व सर्व SARI रुग्णांचे कोविड १९ साठी चाचणी करण्यात यावी.
३. सर्व पॉझिटिव्ह नमुने जिनोम सिक्वेंसिंग साठी पाठविण्यात यावेत.
४. सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य संस्था, वैद्यकीय शिक्षण विभाग अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालये व महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये, येथे कोविड १९ ची चाचणी सुविधा व उपचाराची सुविधा या बाबी आद्ययावत ठेवण्यात याव्यात.