
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्सवर धुव्वाधार विजय
चेपॉकच्या मैदानावर आरसीबीने ५० धावांनी मोठा विजय नोंदवला. आरसीबीने २००८ नंतर म्हणजेच ६१५५ दिवसांनंतर चेन्नईच्या घरच्या मैदानावर विजयाची चव चाखली. धोनी मैदानावर असूनही सीएसकेच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. संपूर्ण सामन्यात आरसीबीच्या संघाने सीएसकेवर दबाव कायम ठेवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत आरसीबीने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरूवात खूपच खराब झाली….