पुण्यात वन्यजीव उपचारांचा ‘जोडधंदा’, पुणे वनविभागाचे दुर्लक्ष
नेत्वा धुरी – पुणे येथील वन्यप्राणी उपचारांचे प्रमुख केंद्र म्हणून नावाजलेल्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या खासगी वन्यप्राणी उपचार केंद्राने नियमबाह्य पद्धतीने वन्यप्राणी उपचारांचा जोडधंदा सुरु केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रेस्क्यू चॅरिटॅबल ट्रस्ट हे पुण्यातील वनविभागाच्या देखरेखीअंतर्गत वन्यप्राणी उपचार केंद्र म्हणून काम करत आहे. मात्र या केंद्रात उपचारांसाठी दाखल होणा-या वन्यप्राण्यांना वनविभागाकडून कोणतीही रितसर परवानगी…
