मुंबईः बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्याने त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ 20 ते 25 रुपये दर मिळत आहेत.
भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा. मात्र, पारंपरिक भातपिक उत्पादक शेतकरी (Farmers) आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडं वळलेत. मात्र, सध्या हे बागायती शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत. बागायती शेतीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्यानं त्याचे दर कोलमडलेत. एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो भरल्या जातात. मात्र, या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात केवळ 20 ते 25 रुपये दर मिळत आहेत.
एक कॅरेट टोमॅटो लागवड ते बाजारात विक्रीपर्यंत सुमारे 90 रुपयांचा खर्च शेतकऱ्याला येतो. या एक कॅरेट टोमॅटोला केवळ 25 रुपयेपर्यंत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना 65 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. धानाला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतो, त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही तशाच प्रकारे हमीभाव दिल्यास शेतकऱ्याची आर्थिक स्थिती उंचावेल, अशी अपेक्षा आता शेतकरी बाळगत आहेत.