परभणी : (BacchuKadu) माळसोन्ना (परभणी) येथील सचिन बालाजी जाधव व त्यांची सात महिन्याची गर्भवती पत्नी ज्योत्स्ना सचिन जाधव या तरुण दाम्पत्याची आत्महत्या नव्हे तर शासनाने केलेला तिहेरी हत्याकांड आहे. असा आरोप माजी मंत्री बच्चू कडू यांनी आरोप केला आहे. तर ज्या गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या माळसोन्ना गावात जाऊन कडू यांनी रक्तदान करत केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला आहे.
https://x.com/maha_lakshvedhi/status/1913512319566356506
संपूर्ण गावाने केले रक्तदान (BacchuKadu)
याबाबत कुठे संताप ना चीड ना विवाद आहे. सर्व शांत आहेत हीच जर हत्या जाती धर्माच्या वादात झाली असती तर दंगली भडकल्या असत्या. संपूर्ण गावाचे गाव पेटली असती आज शासनाच्या धोरणामुळे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही स्वर्गीय सचिन व जोत्स्ना जाधव यांच्या घरी रक्तदान करून राग व्यक्त करीत आहे.
https://youtube.com/shorts/2zc1zNBbmkI?si=qj3Oa831v2tOjGUl
रक्तदान करून केलेल्या निषेधातून सरकारची अक्कल ठिकाणावर आली नाही तर आम्हाला रक्त सांडवावे लागू नये हीच अपेक्षा असल्याचा संताप व्यक्त करत बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.facebook.com/share/v/12KYHCv7qhq/