
राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मान्यवरांचे सलोख्याचे आवाहन
सण-उत्सवांचा माहोल आहे. रंगोत्सव, रमजान, लोहडी, वसंतोत्सव आणि गुढी पाडवा! पण राजकीय – सामाजिक वातावरण दूषित झाल्याने सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नागपुरात हिंसाचार, कोकणातल्या घटना, अहिल्यानगर-मढी येथे धार्मिक तेढ या अशांततेत जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे बंधुता, समता आणि सलोखा. छत्रपती शिवरायांनी त्याची पायाभरणी केली; संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, शेख महंमद, जनाबाई,…