सण-उत्सवांचा माहोल आहे. रंगोत्सव, रमजान, लोहडी, वसंतोत्सव आणि गुढी पाडवा! पण राजकीय – सामाजिक वातावरण दूषित झाल्याने सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
नागपुरात हिंसाचार, कोकणातल्या घटना, अहिल्यानगर-मढी येथे धार्मिक तेढ या अशांततेत जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्र धर्म म्हणजे बंधुता, समता आणि सलोखा. छत्रपती शिवरायांनी त्याची पायाभरणी केली; संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, शेख महंमद, जनाबाई, चक्रधर आदींनी तो रुजवला. फुले, शाहू, आंबेडकरांनी आखून दिलेल्या सामाजिक लक्ष्मणरेषेवर आपण ठाम आहोत, ती कुणी पुसू शकणार नाही. काही शक्ती बखेडा निर्माण करत महाराष्ट्र धर्माला नख लावू मागत आहेत. ते होऊ देता कामा नये.
चला, या असहिष्णुतेच्या काळोखात गुढी उभी करूया बंधुतेची, ईद साजरी करूया सलोख्याची, हीच आपली परंपरा जपण्याचे आवाहन डॉ. तारा भवाळकर, डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षि, डॉ. गणेश देवा, डॉ. रावसाहेब कसबे, अब्दुल कादर मुकादम, कपिल पाटील, निखिल वागळे, डॉ. झहीर काझी, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल अजित शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल राजा कांदळकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल